नवी दिल्ली । प्रतिनिधी
केंद्रीय अल्पसंख्यक मामले विभागाचे मंत्री श्री. किरेन रिजिजू यांची नवी दिल्ली येथे खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट घेऊन पवित्र हज यात्रा–२०२६ नोंदणी संदर्भातील पहिला हप्ता भरण्याची अंतिम तारीख वाढवावी, अशी मागणी केली.
हज यात्रेसाठी लॉटरी जाहीर झाल्यानंतर सलग बँक सुट्ट्या आणि बँकांमध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक इच्छुक यात्रेकरूंना वेळेत पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करता आली नाही. परिणामी, अनेक अर्जदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.या संदर्भात सर्व इच्छुक अर्जदारांना न्याय मिळावा, कोणीही अन्यायग्रस्त ठरू नये आणि सर्वांना हज यात्रेत सहभागी होता यावे, या उद्देशाने दि. ३० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी विनंती खासदार सोनवणे यांनी मंत्र्यांकडे केली.या मागणीवर मा. किरेन रिजिजू यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!