आपला बीड जिल्हा

बैल दरीत गरीब शेतकरीपुत्र मुंडेनी घेतली थेट पंकजाताई मुंडे यांची भेट ; आता बैल वाचेल का ?

वादळवार्ता वार्तांकन – मुबोशेरोद्दीन खतीब

धारूर तालुक्यातील काटेवाडी गावाच्या शिवाराच्या दरीत ३१ अक्टोबर रोजी सायंकाळी 05 वाजता बालासाहेब मुंडे यांचा बैल गावापासुन 8 किमी च्या अंतरावर असणाऱ्या दरीत पडला दुसऱ्या दिवशी समजल्यावर मुंडे कुटुबीय बैलास बघण्यास गेले असता तो बैल उठत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पशुसंवर्धन, तलाठी , धारूरचे तहसिलदार यांची भेट घेतली , पंचनामा झाला परंत बैल अद्यापही खोल दरीतच असल्याकारणाने व स्थानिक पातळीवरील प्रशासनाने हात झटकल्यामुळे तसेच बैल दरीत पडुन आकरा दिवस झालेमुळे मुंडे कुटुंबीय हताश झाले होते.

परंतु आज मुंडे कुटुबांशी वादळ वार्ताचे अजय भांगे यांनी संवाद साधुन पंकजाताई मुंडे यांचा दौरा केजमध्ये असल्याची माहिती बालासाहेब मुंडे यांना देताच बालासाहेब मुंडे यांनी आपला मुलगा नामदेव मुंडे यांना केज येथे पाठवले असता नामदेव मुंडे ,पत्रकार अजय भांगे , पत्रकार मुबशिर खतीब यांनी शिक्षक कॉलनी केज येथे सायं. 6.30 वाजता पंकजाताई मुंडे यांची भेट घेतली मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांना सविस्तर हकिकत सांगीतली त्यानंतर ताईनी बैल काढण्यासाठी सर्व काही मदत करू असे अश्वासन दिले आहे.

आज पंकजाताई मुंडे यांनी दिलेल्या अश्वासनामुळे मुंडे यांचा बैल वाचेल का ? मतद होईल का ? असा प्रश्न मुंडे कुटुंबीय व धारूर तालुक्यातील परिसरात नागरीकांना पडला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!