वादळवार्ता – गौतम बचुटे
अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या तणावातून पीडितेच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना केज तालुक्यात घडली आहे.
केज तालुक्यातील एका आदिवासी समाजाच्या वस्तीवर बहिणीला भेटायच्या बहाण्याने येत असलेल्या सुनेच्या भावाने मेव्हण्याच्याच अल्पवयीन बहिणीवर घरात कोणी नसल्याची संधी साधून लैंगिक अत्याचार केला. ही घटना पीडितेच्या आईला समजताच तिने मानसिक तणावातून आणि समाजात बदनामी होईल म्हणून दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:०० वा. च्या दरम्यान वस्तीवरील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक दिलीप गित्ते, पोलीस नाईक महादेव बहिरवाळ आणि पोलीस नाईक शमीम पाशा यांनी घटनास्थळी जाऊन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे घेऊल आले.
दरम्यान पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्या बदनामीमुळे पीडित मुलीच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गुन्हा केज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात येत आहे.
पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक सिमाली कोळी या करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!