आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

माळेगाव येथे अज्ञात वाहनांच्या धडकेत वृद्ध महिला आणि म्हैस जागीच ठार

वादळवार्ता – गौतम बचुटे

केज-कळंब रोडवरील माळेगाव येथे शेतातून म्हैस घरी घेऊन येत असलेल्या एका महिलेस भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने वृद्ध महिला आणि तिच्या सोबत असलेल्या म्हैस जागीच ठार झाली.

या बाबतची माहिती अशी की, बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:०० वा च्या सुमारास रुक्मिणी शंकर गुंठाळ वय (५८ वर्ष) या शेतातून म्हैस चारून घरी घेऊन येत असताना माळेगाव येथील पुलावर त्यांना पाठमागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. यात रुक्मिणीबाई शंकर गुंठाळ आणि म्हैस जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या आदेशाने पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!