वादळवार्ता – केज
अल्पावधीतच डिजिटल मीडिया क्षेत्रात लोकप्रिय झालेले स्टार 24 न्यूज चॅनेल व न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिन रहाटणी, पुणे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
डिजिटल मीडिया क्षेत्रात स्टार 24 न्यूज चॅनेल व न्यूज पोर्टलने अल्पावधीतच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणे,वंचित, पिडीतांचे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे,चांगल्या गोष्टींना प्रसिध्दी तर चुकलेल्या विरुद्ध आवाज उठवण्याचे काम या चॅनेलला माध्यमातून गेली वर्षभर झालेले आहे.बातमीची दखल घ्यायला लावणारे चॅनेल म्हणून नावलौकिक मिळवला आहे.द्वितीय वर्षात पदार्पण करत संपूर्ण महाराष्ट्रात या चॅनेल चे जाळे पसरवले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून व शुभेच्छा देण्यासाठी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश तात्या गालफाडे,भाई विशाल जाधव,बारा बलुतेदार प्रदेश युवा प्रदेशाध्यक्ष, कविता आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष, सायली ताई किरण नढे काँग्रेस पार्टी महिला शहराध्यक्ष, माजी नगरसेविका सविता खुळे ,माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक गोपाळ माळेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, सोमनाथ शेळके बारा बलुतेदार महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष, हरेष आबा नखाते शिवसेना उपशहर प्रमुख, जितेंद्र मोटे वंचित बहुजन आघाडी शहर सचिव, अनिता पांचाळ महिला उपाध्यक्ष मनसे, दीपक कांबळे एम आय एम उपाध्यक्ष,शिवाजी मधुकर खडसे शाखाध्यक्ष काळेवाडी वंचित बहुजन आघाडी,यांच्यासह राजकीय पक्षाचे नेते,विविध संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अखेरीस स्टार 24 न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक संतोष गोतावळे,संपादक दत्तात्रय मुजमुले यांनी संर्वांचे आभार व्यक्त केले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!