केज तालुक्यातील बोरगाव (बु.) येथे ग्रामपंचायत गावठाण हद्दीत पुरातन खंडोबा मंदिर आहे. काही वर्षापुर्वी मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मागील काही दिवसात खंडोबा मंदिरामागील वस्तीतील घराचे बांधकाम मंदीरालगत करण्यात येत होते. त्यामुळे खंडोबाच्या यात्रेतील काठ्या पालखी यांना प्रदक्षिणा घालण्यात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे गावातील खंडोबा भक्त एकत्र येऊन त्यांनी अतिक्रमण काढण्याचे निवेदन बोरगाव (बु.) ग्रामपंचायत कार्यालयाला दिले आणि १५ ऑगस्ट २०२३ रोजी १०ः०० पासुन उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी या निवेदनात सांगीतले. १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहनानंतर काहीच वेळातच उपोषण कर्त्यानी ग्रा. पं. च्या बाहेर उपोषणास सुरूवात केली. ही बाब संरपंचाच्या निदर्शनास येताच त्यांनी अतिक्रमण केलेल्या संबंधीत व्यक्तीस बोलावून घेत तोडगा काढला आणि तात्काळ अतिक्रमण करून केलेले अवैध्य बांधकाम तोडून काढले.आणि उपोषण सुटले
तात्काळ अतिक्रमण काढून सरपंचांनी उपोषण कर्त्यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. समस्येचं तात्काळ निराकरण झाल्यामुळे उपोषण कर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी उपोषण कर्त्यांना बिष्कीटे खाऊ घालून त्यांना उपोषण मागे घ्यायला लावले.
गावातील हा तिढा अतिशय संयमाने सोडवल्यामुळे संरपंचाचे सर्वत्र कौतूक होत आहे. या आधीही २००७ ते २००९ या कालावधीत बाळासाहेब गव्हाणे हे संरपंच होते. तेव्हाही सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे त्यांनी काढली होती. पुन्हा त्यांच्याच सत्तेत हा अतिक्रमणाचा तिढा सुटल्यामुळे त्यांचे गावकऱ्यांकडून कौतूक करण्यात येत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!