वादळवार्ता – गौतम बचुटे
केज- कळंब रोडवर साळेगांव येथे झालेल्या मोटार सायकलच्या अपघातात दुचाकीच्या कुशन कव्हर विक्रेता गंभीर जखमी झाला आहे.
दि . २० जून रोजी रात्री ८:३० वा. सुमारास अक्षय दादाराव जोगदंड वय २५ वर्ष रा साळेगांव ता. केज याच्या मोटार सायकलचा साळेगांव येथील केज.कळंब रोडवरील सलीम शेख यांच्या शेतकरी अमृततुल्य चहाच्या हॉटेल जवळ अपघात झाला. या अपघातात चिंचोली पाटी जवळ महामार्गावर दुचाकी व इतर वाहनांचे सीट कव्हर विक्रीचा व्यवसाय करीत असलेला अक्षय जोगदंड याच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. अपघात झाल्या नंतर रवि बचुटे व कैलास पटणे यांनी जखमी अक्षय जोगदंड याला खाजगी वाहनाने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. उपजिल्हा रुग्णालयातील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत, त्यांचे सहकारी व स्टाफ यांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील संदर्भीय उपचारासाठी इतर ठिकाणी हलविले आहे.
दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला? हे स्पष्ट झालेले नाही.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!