वादळवार्ता वार्तांकन – महादेव काळे
केज तालुक्यातील देवगाव येथील वैभव गोविंद मुंडे वय १८ वर्ष या युवकाचे पनवेल नवी मुंबई येथे मंगळवारी सायंकाळी ६:०० वा. दरम्यान आपघाती निधन झाल्याने देवगाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील देवगाव येथील वैभव गोविंद मुंडे हा इलेक्ट्रॉनिक आय. टी. आय चे शिक्षण घेण्यासाठी पनवेल नवी मुंबई येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता..मंगळवार दि.२६ जूलै रोजी आपल्या मित्रा सोबत सांयकाळी रेल्वे मार्गावरून फिरत अस्ताना वैभव यास पाठी मागून येणा-या रेल्वे इंजिनचा धक्का लागला व तो युवक रेल्वे पटरीवर पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.
वैभवच्या निधना बद्दलची माहीती त्याच्या सोबत असलेल्या मित्राने वैभवच्या वडीलांना दिल्या नंतर वैभवच्या नातेवाईकांनी पनवेल येथे जाऊन बुधवारी सकाळी शवविच्छेदना नंतर मृतदेह ताब्यात घेतला व बुधवारी सांयकाळी देवगांव येथे वैभववर अंतिम संस्कार करण्यात आले. वैभव यांच्या पश्चात आई-वडील, आजी आजोबा, भाऊ, बहीणीसह नातेवाईक असा मोठा परिवार आहे. वैभवच्या आपघाती निधनाने देवगाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!