आपला बीड जिल्हाक्राईम

पिंपळगाव फाट्यावर ७ जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले 

गौतम बचुटे / केज – वादळवार्ता वार्तांकन

केज – बीड महामार्गा वरील पिंपळगाव फाट्यावर केज पोलिसांच्या पथकाने छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या ७ जणांना पकडले. त्यांच्याकडून ४ हजार ५५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

केज – मांजरसुंबा महामार्गा वरील पिंपळगाव फाट्या जवळील हनुमंत धस यांच्या हॉटेलच्या पाठीमागे काही लोक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती केज ठाण्याचे प्रमुख सपोनि शंकर वाघमोडे यांना मिळाली.

त्यांच्या आदेशा वरून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि दिलीप गित्ते शमीम पाशा आणि गृहरक्षक दलाचे जवान चाटे, आंधळे यांच्या पथकाने रविवार ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी लक्ष्मण शामराव केदार, महादेव सखराम केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार, सचिन संपत शिंदे सर्व चौघे रा. सांगवी ता. केज, निळुकांत वामन शिंदे रा. एकुरका, बिभीषण मधुकर केदार, हनुमंत तुकाराम धस हे ७ जण बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळताना असताना त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून ४ हजार ५५० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलीस नाईक शमीन पाशा यांच्या फिर्यादीवरून वरील सात जणां विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दिलीप गित्ते हे करत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!