वादळवार्ता/गौतम बचुटे
केज तालुक्यातील कानडी माळी येथील नववीच्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी घरी गुटखा खाऊन आला म्हणून त्याचे वडील रागावले म्हणून तो घरातून फरार झाला आहे.
केज तालुक्यातील कानडी माळी येथील रविंद खाडे यांचा मुलगा करण हा गुटखा खाउन घरी आल्याने त्याचे वडील त्यास रागाने बोलले व पुन्हा जर गुटखा खल्लास तर तुला त्याची शिक्षा देईन. असे म्हणाल्यामुळे करण हा रागाच्या भरात घरातून निघून गेला. त्या नंतर रात्री १२:०० वा. शेजारील नवनाथ राउत यांनी त्यांना सांगीतले की, करण हा त्यांना म्हणाला की, त्याला हैद्राबादला जायचे आहे त्यासाठी ५०० रु. मोबाईलवर पाठवा. असे म्हणाल्याने रवींद्र खाडे यांनी त्याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही.
म्हणून त्यांनी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून करण याचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास तपासी अधिकारी पोलीस जमादार सुधाकर दौंड हे करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!