वादळवार्ता – किल्लेधारूर
दिनांक ३१ मे २०२३ रोजी बुधवारी किल्ले धारुर बस आगारामध्ये वाहक श्री.हरीदासराव भांगे व चालक श्री. नंदकुमार भारती यांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारोह प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ विधीज्ञ ॲड.एन.एम.मुंडे हे होते.
किल्लेधारूर आगारात कार्यरत असलेले वाहक श्री.हरीदास भांगे व चालक श्री.नंदकुमार भारती हे त्यांच्या निश्चित वयोमर्यादेमुळे दिनांक ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले.त्यांना निरोप देण्या करीता धारूर आगाराचे आगार प्रमुख श्री कोमटवार साहेब व त्यांचे सर्व वाहक,चालक, मॕकॅनिक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी श्री.भांगे व श्री.भारती यांना भावपुर्व निरोप दिला त्या प्रसंगी त्यांनी छान असा निरोप समारंभाचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना ॲड.एन.एम.मुंडे यांनी हा देश पंतप्रधान,मंत्री व कलेक्टर यांच्यामुळे चालत नसुन शेतकरी, कष्टकरी व कामगार यांच्यामुळे चालतो.असे सांगुन बस ड्रायव्हर व वाहक यांच्या कामाची तुलना थेट महाभारतातील भगवान श्रीकृष्णाशी करून श्रीकृष्णाने एकट्या अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले,मात्र आधुनिक बस ड्रायव्हर व कंडक्टर हे हजारो माणसाच्या रथाचे सारथ्य करीत असुन ते दरदिवस हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी अगदी सुखरूप व आरामात पोंहचवतात व त्यांची कार्ये सिध्दीस लावतात,असे सांगुन एस.टी. महामंडळातील तमाम चालक,वाहक, मेकॅनिक यांच्या कार्याचे व कर्तव्याचे महत्व अधोरेखित केले.याप्रसंगी श्री.भांगे व श्री.भारती यांचे कुटूंबिय व सर्व नातेवाईक आर्वजुन उपस्थित होते.श्री भांगे यांचे भाऊ नामदेव भांगे, भावजय सुरेखा व पुतणे दिपक भांगे यांनी वाहक श्री.हरीदास भांगे व त्यांची पत्नी सौ.किसकींदा यांचे त्यांच्या कुटूंबा करीताचे योगदान सांगितले. त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. उपस्थितांनाही या प्रसंगामुळे एस.टी. ड्रायव्हर व कंडक्टर यांना शासन कमी पगार देत असले तरी त्यांचे,त्यांच्या कार्याचे महत्व पटले.या कार्यक्रमाकरीता धारूर आगार प्रमुख श्री.भारत कोमटवार,तसेच श्री.भांगे यांचे मित्र श्री.उध्दव मुरकुटे सर,कृष्णा बँकेचे मुख्याधिकारी वसुदेवराव मुंडे, देवगावचे माजी सरपंच हरीदास मुंडे, डोका गावचे सरपंच श्री. भांगे, ॲड. एस. एस. भांगे व श्री.भांगे व भारती यांचे इतर सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुनीर खुरेशी चालक यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्या करीता वाहक छंदर गिते, अभिमान चौरे यांनी व इतर सर्व कामगारांनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन श्री.मुळे चालक यांनी केले.शेवटी सुरूची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!