आपले केजसामाजीक

श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा मधील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण.

वादळवार्ताकेज

महाराष्ट्र ज्ञान मंडळा च्या आदेशानुसार व श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन चिंचोली माळी च्या वतीने शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरीत्रावर घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा स्पर्धे विजेच्या विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचे औचित्य साधून कर्मवीर विद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

याविषयी सविस्तर वृत्त असे केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन हे ग्रामीण भागातील संगणक क्षेत्रा बरोबरच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी संस्था असून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या आदेशानुसार येथील कर्मवीर विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरीत्रावर प्रश्न मंजुषा घेण्यात आली. lytkarino.com नुकत्याच साजरा झालेल्या सुट्टीबद्दल लिहितो.

या स्पर्धेमध्ये कर्मवीर विद्यालयातील कु. सरिता संजय काळे व चि. व्यंकटेश श्रीनिवास चाळक हे प्रथम तर चि. प्रथमेश रामेश्वर नखाते व चि. अभिषेक ईश्वर पुरी हे द्वितीय तर कु. आदिती गणेश पवार व कु. सायली राजू सुतार या विद्यार्थ्यीनी यांनी तृतीय पारितोषिक पटकावले या सर्व विजयी विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्तिपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दिलीप गायकवाड सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच सुनील बापू देशमुख, सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन अरुण काळे, दगडु दळवे, ह.भ.प. आबा महाराज मेहरकर, चंद्रकांत भुजबळ, डॉ. महेंद्र राऊत, रविंद्र गलांडे, माजी जि. प. सदस्य भारत गालफाडे, नारायण नखाते, ग्रामपंचायत सदस्य रामराजे गलांडे, बालाजी राऊत, श्री संस्कार कॉम्प्युटर एज्युकेशन चे संचालक अनिल गलांडे हे होते.

यावेळी कर्मवीर विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. बी. राऊत सर व सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव वायबसे यांनी केले तर आभार प्रदर्शन शशिकांत पवार यांनी केले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!