केज तालुक्यातील तथा शहरातील चंदनाची झाडे दिवसेंदिवस कमी होत असताना दिसत आहेत . त्याचे कारणही तसेच आहे कोणत्याही गोष्टीची परवा न करता चंदनचोर मोठ मोठी चंदनाची झाडे तोडून तस्करी करत आहेत.
या याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि केज शहरातील शासकीय विश्रामग्रह केज च्या परिसरातील चंदनाचे तीन मोठे झाडे चंदनचोरांनी धारदार शस्त्राने कापून पळवली आहेत तर दोन झाडे आरध्यावर कापून सोडली आहेत.
यावरून हेच दिसुन येते कि अवघ्या काही अंतरावर केज पोलिस ठाणे असतानाही चंदनचोरांनी निर्भिडपणे चंदनचोरी करून तस्करी करण्यात यशस्वी झाले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!