वादळवार्ता – गौतम बचुटे
नांगरणी करीत असताना बांधावरून ट्रॅक्टर गेले म्हणून शेजारच्या शेतकऱ्याने दगडाने मारहाण केली आहे.
विक्रम बळीराम चाळक हे दि. २३ फेब्रुवारी रोजी रात्री ११:०० वा. च्या सुमारास त्यांच्या लव्हुरी ता. केज येथील शिवारातील सर्व्हे नंबर १६७ मध्ये सचिन बळीराम चाळक यांच्या ट्रॅक्टरने नांगरणी करीत होते. त्यावेळी त्यांच्या शेता शेजारी शेत असलेले नारायण शंकर चाळक याने शेत नांगरीत असलेल्या ट्रॅक्टरवर दगड फेक केली. त्याला दगड का मारतोस? असे विचारीत असतांना त्याच्या शेताच्या बांधाने ट्रॅक्टर का घेवुन गेलात ? असे म्हणुन त्याने दगड फेकुन मारण्यास सुरूवात केली. यात विक्रम चाळक यांच्या कोपरावर व पायावर दगड लागला आहे.
या प्रकरणी विक्रम चाळक यांच्या तक्रारी वरून दि. २४ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात गु. र. न. १०५/ २०२३ भा. दं. वि. ३२४, ३२३, ३३६, ५०४, ५०६ नुसार नारायण चाळक याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुकमानंद घोलप हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!