आपला बीड जिल्हाआपले केज

केज येथे एच डी एफ सी बँक शाखेचे उद्घाटन संपन्न

वादळवार्ता – रमेश गुळभिले

केज शहरात भारत गॅस एजन्सी जवळ दी १० रोजी एच डी एफ सी केज शाखेचे उद्घाटन सहायक गटविकास अधिकारी सविता शेप विठ्ठल नागरगोजे गटविकास अधिकारी वडवणी याच्या हस्ते करण्यात आले व दिप प्रज्वलन सचिन अग्रवाल क्लस्टर हेड रश्मी प्रभू सर्कल हेड अभिषेक देशमुख व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सुर्यवंशी शाखा व्यवस्थापक शीतल बनाळे यांच्या हस्ते करण्यात आले .

सचीन अग्रवाल यांनी बोलताना सांगितले की, मराठवाड्यातील एकमेव पाहिली शाखा केज येथील अशी आहे की, येथे संपुर्ण महिला कर्मचारी आहेत एच डी एफ सी बँकेने या वर्षी ७०० नवीन शाखा सुरु केल्या आहेत व पुढील काही दिवसांतच नवीन ५०० शाखाची सुरूवात होणार आहे व्यापारी संघाच्या वतिने महादेव सुर्यवंशी यांनी जास्तीत जास्त व्यापारी खाते शाखेस देऊ असे ठामपणे सांगितले तसेच विठ्ठल नागरगोजे यानी बोलताना सांगितले इतर बॅकेच्या तुलनेत या बॅकेत सर्व सोयी सुविधा भरपुर प्रमाणात उपलब्ध आहेत सविता शेप यानी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पंचायत समितीचे जास्तीत जास्त खाती उघडली जातील व सर्व महिला कर्मचारी बॅकेत असल्यामुळे सर्वात जास्त खाती महिला वर्गातून बॅकेत होतील असा विश्वास व्यक्त केला शाखा व्यवस्थापक शीतल बनाळे यानी सांगितले की, एच डी एफ सी बॅकेत सर्व सोयी आम्ही ग्राहकांना देण्यात प्रथम प्राधान्य देऊ आमचे व्याज दर इतर बॅकेच्या तुलनेत कमी आहेत तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल ए टी एम सुविधा व्यापारी , शेतकरी , नौकरवर्ग , सर्वच क्षेत्रातील नागरीकाना त्याच्या वैयक्तिक कर्ज, शालरी कर्ज , शिक्षण कर्ज , गोल्ड कर्ज , होम कर्ज , तात्काळ देण्यात येईल व सर्व ग्राहकाच्या आडि आडचणी सोडविण्यात येतील असे ठामपणे सांगितले येईल म्हणून आमच्या शाखेत जास्तीत खाती उघडावीत असे अहवान करण्यात आले या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार दुलाजी मेंडके. आय पी एस पंकज कुमावत , राजेंद्र मोराळे , सचीन देशपांडे , सुहास हजारी , बीड शिल्पा बनाळे शाखेचे मॅनेजर विजय नाईक , अंबाजोगाई शाखेचे मॅनेजर अजित देवणे , करपे, जमाले दादा , रमेश गुळभिले , व शहरातील | बहुसंख्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटीं सर्वाचे आभार शाखा व्यवस्थापक शीतल बनाळे यांनी मानले

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!