वादळवार्ता वार्तांकन – केज
योग हे एक प्राचीन भारतात उगम पावलेले आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. योग हे वैदिक षड्दर्शनांमधील एक दर्शनसुद्धा आहे. योगा हि एक अशी गोष्ट आहे जी शरीर, मन, आत्मा आणि विश्व एकत्र करते. योगाचा इतिहास सुमारे ५००० वर्षांचा आहे जो प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात मन आणि शरीराचा अभ्यास म्हणून ओळखला जातो. योगाच्या विविध शैलींमध्ये शरीराची मुद्रा, श्वास घेण्याची तंत्रे आणि ध्यान किंवा विश्रांती यांचा समावेश होतो.
याचाच भाग म्हणुन विजय स्पोर्टस् अकॅडमी केज संचलित भव्य योगा क्लासेसचे आयोजन दि.१ जानेवारी २०२३ पासुन दर रविवारी विद्यादन बालविद्यालय मंगळवार पेठ केज येथे सकाळी ६ ते ९ प्रमाणे केले आहे. सदरील योगा आभ्यासाचे शिक्षण देण्याकरीता केज येथील तज्ञ योगशिक्षिका श्रीमती जयश्री गुंड याच्या माध्यमातुन मिळणार आहे .
धगधगत्या जीवनाच्या आरोग्या करिता जास्तीत जास्त विद्यार्थि , तरुण , तरुणी तथा वृद्ध असलेल्यांनी सहभागी होऊन सदरील योगा क्लासेस लाभ घ्यावा तसेच संपर्कासाठी केज तालुका क्रिडा संयोजक विनोद गुंड , महादेव गिरी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन योगा शिक्षीका जयश्री गुंड यांनी केले आहे.