आपले केजनिवडणुक

सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक – 2022 च्या संदर्भांत सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांचे जनतेला महत्वपूर्ण आवाहन

🚨 केज तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक – 2022 च्या अनुषंगाने केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांचे जनतेस आवाहन करण्यात आले आहे.🚨

वादळवार्ता वार्तांकन – केज

पोलीस स्टेशन केज ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने परिस्थिती निर्माण केल्यास तसेच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होईन असे वर्तन केल्यास त्याचेवर प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येईल कोणतीही गय केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

 त्याच प्रमाणे सोशल मिडीयावर सुध्दा बीड सायबर पोलीसांची कटाक्षाने नजर असुन कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट/संदेश निर्मित करणे, प्रसारित किंवा पुढे पाठवणे टाळावे अशा प्रकारचे कृत्य करणा-या व्यक्तीवरं तात्काळ प्रचलित कायदान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षण घेणारे तरूण युवकांनी यामध्ये सक्रिय होतांना कोणत्याही भुलथापाना व प्रलोभनास बळी पडु नये. ते स्थानिक पातळीवर कोणत्याही अनुचित प्रकारामध्ये किंवा आचार संहितेचे उल्लंघन होईन असे वर्तन करू नये. ज्यामुळे त्यांचे वर गुन्हे दाखल होवुन,पोलीस रेकॉर्ड बनेल कारण दाखल गुन्हयाची माहिती ही चारित्र्य प्रमाणपत्रावर नोंद होत असल्याने भविष्यातील उज्जवल व चांगल्या संधीस युवकांना मुकावे लागेल याबाबत पालकांनी पण कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे निवडणुक काळात युवकांनी जबाबदारीने वागने अत्यंत आवश्यक आहे.

केज तालुका ग्रा.पं. निवडणुकीच्या दृष्टीने हद्दीतील सर्व गावात शांतता राखणे,लोकशाहीच्या मार्गाने मतदान प्रक्रिया पूर्ण करने,सर्व आचार संहितेचे नियमांचे पालन करणे हे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीसांना आणि महसूल विभागास माहिती द्यावी.

सर्व उमेदवार आणि नागरिकांनी आचार संहितेच्या नियमांचे पालन करावे…

शंकर श्रीराम वाघमोडे

सहा.पोलीस निरीक्षक,

प्रभारी पो.स्टे. केज.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!