वादळवार्ता – केज
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या बारावी वार्षिक परीक्षेत वसुंधरा उच्च माध्यमिक विद्यालय पैठण विज्ञान शाखा 98.46% कला शाखा 92.68% शाळेचा निकाल 96.22% लागला आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातून 106 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 38 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेतून सर्वप्रथम शिनगारे अश्विनी 84.50% चौधरी तृप्ती शंकर 84.33% व गायकवाड साक्षी 84.33% सर्व द्वितीय तर तरकसे निलेश वासुदेव 84.17% गुण मिळवून सर्व तृतीय आला आहे. कला शाखेतून सर्व प्रथम कु गोरे ज्योती सुरेश 80.67% द्वितीय कु. हंडीबाग अंजली हनुमंत 79.83%तृतीय चि.जाधव अजय भारत 77.83%आला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन मा. बजरंग बप्पा सोनवणे,अध्यक्ष सौ. सारिकाताई सोनवणे, उपाध्यक्ष मा.बाळकृष्ण भवर बापू, सहसचिव ॲड.गोपाळराव कांदे,साहेब जि प सदस्य मा. शंकर अण्णा उबाळे,पंचायत समिती सदस्य मा.शिवाजीराव चौधरी, संचालक मा.परमेश्वर अण्णा चौधरी, मुख्याध्यापक प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!