आपला बीड जिल्हाआपले केजब्रेकिंग न्युज
केज नगरपंचायतने विज बिल न भरल्यामुळे धनेगावचा विद्युत पुरवठा खंडित

पाण्यासाठी केजकर त्रस्त ; सत्ताधारी, मुख्याधिकारी नगरपंचायतच्या AC मध्ये मस्त
वादळवार्ता – केज
केज नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे केज शहरातील सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या संकटाना सामोरे जावे लागत आहे. महावितरनने थकबाकी व चालू बिल न भरल्यामुळे धनेगावचा विज पुरवठा खंडीत केला आहे. धनेगावचे महाकाय धरण जवळ असुन सुद्धा ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी विकत घेण्याची वेळ केज शहरातील जनतेवर आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की केज नगरपंचायतकडे महावितरणचे एकुन थकबाकी विज बिल 13 कोटी 16 लक्ष 80 हाजार रुपये ऐवढे तर धारूर नगरपरिषदेकडे 3 कोटी 67 लक्ष 81 हजार थकलेले आहे.तर चालु विज बिल धारूर नगरपरिषद आणी केज नगरपंचायत या दोघानंमध्ये 10 लाख 49 हजार ऐवढे आले असुन बिलासाठी चार दिवसापूर्वी खंडीत केलेला विद्युत पुरवठा आद्याप पर्यंत बिल न भल्यामुळे पूर्ववत सुरु केलेला नसुन यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये केज शहरातील नागरीकांचे पाण्यासाठी अतोनात हाल सुरु असताना केज नगर पंचायतचे प्रशासन व सत्ताधारी केव्हां थकित /चालु विज बिल भरतात याकडे केज शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
महावितरणला सोमवारी विजबिल भरणा करुण पाणीपुरवठा पूर्ववत सुरु केला जाईल .
शीतलताई दांगट
उपनगराध्यक्षा केज न.प.



