आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

कोयता व कत्तीने हल्ला करून लुटणारी केज तालुक्यातील गँग स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

युसूफवडगाव आणि बोरीसावरगाव पेट्रोल पंप लुटणारी कोयता गॅंग स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कोयता व कत्तीने हल्ला करून लुटणारी टोळी केज तालुक्यातील !!

गौतम बचुटे/केज 

मागील आठवड्यात अवघ्या २५ मिनिटात केज तालुक्यातील युसुफवडगाव आणि बोरीसावरगाव येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकून फरार झालेली कोयता गॅंग स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहे.

केज तालुक्यात दि. १६ फेब्रुवारी रोजी ११:२३ वा. च्या सुमारास युसुफवडगाव येथील शिवरुद्र चोपणे यांच्या शुभम पेट्रोलियम सर्व्हिसेस या पेट्रोल पंपावर दोन मोटार सायकल वरून आलेल्या चौघांनी पेट्रोल पंपाच्या कार्यालयाचा काचेचा दरवाजा फोडून मॅनेजरला धारदार तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवून पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दहशत निर्माण करून करून कपाटातील २५ हजार ३०० रु. रोख रक्कम घेऊन पळून गेले होते. त्या नंतर पुढे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरीसावरगाव येथील विश्वनाथ सोमवंशी यांच्या सोमवंशी पेट्रोल पंपावरही शस्त्राचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना मारहाण करून ३ लाख ३४ हजार ७७० रु ची रक्कम घेऊन मोटार सायकली वरून पळून गेले होते.

या प्रकरणी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात पेट्रोल पंपावच्या मॅनेजरच्या फिर्यादी वरून अज्ञात दरोडेखोरां विरुद्ध गु र नं ४१/२०२४ भा दं वि ३९४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा तपास युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस।निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे करीत आहेत.

दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साबळे, पोलीस उपनिरीक्षक राडकर आणि त्यांच्या पथकाने गुप्त माहिती काढली. या पथकाला एका गुप्त महितीगाराने दिलेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक साबळे, पोलीस उपनिरीक्षक राडकर, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस जमादार राजू पठाण, तुळशीराम जगताप, बाळकृष्ण जायभाये, अर्जुन यादव, मारुती कांबळे, रामदास तांदळे अतुल हराळे, राहुल शिंदे, पी टी चव्हाण आणि जायभाये यांच्या पथकाने पेट्रोल पंपाच्या दरोड्यातील आरोपीची गुप्त पद्धतीने माहिती काढून विकास सुभाष सावंत (रा. सावंतवाडी, उमरी फाटा ता. केज), अजय उर्फ अज्जू अशोक तांदळे (रा. कोरेगाव ता केज), सोमनाथ राजाभाऊ चाळक (रा. लव्हूरी ता. केज), बालाजी राम लांब (रा कोरेगाव ता. केज), रवी उर्फ आण्णा दत्तात्रय सुर्यवंशी (रा. पिसेगाव ता. केज) यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून पेट्रोल पंपाच्या दरोड्यातील २ लाख रु. आणि गुन्ह्यात वापरलेले ५ कोयते, २ मोटार सायकली व इतर साहित्य ताब्यात घेतले आहे.

एक आठवड्याच्या आत तपास करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी ताब्यात घेतल्या बद्दल स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरोडेखोर ताब्यात घेतल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता 

या कोयता गँगने कळंब आणि वडवणी येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची शक्यता असून दि. २४ जानेवारी रोजी केज तालुक्यातील केज-मांजरसुंबा रोडवर शिंदी फाट्यावर समाधान यादव या पिग्मी एजंटांची मोटार सायकल अडवून त्याच्यावर कोयत्याने हल्ला करून खिशातील मोबाईल व ५७ हजार रु. काढून घेतले असल्याची शक्यता आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!