आपले केजनैसर्गिक

केज तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा—शिवाजी (दादा) ठोंबरे

वादळ वार्ता – केज

केज तालुक्यातील सर्वच महसुल मंडळात परवा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले असून त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावुन घेतल्याने तालुक्यातील शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. काल झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर शासनाचे अधिकारी मा. तहसीलदार, नायब तहसीलदार व त्यांचे महसूलचे अधिकारी यांनी जावुन पहाणी केली . मात्र फक्त पहाणी करुन शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे. त्यासाठी त्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होवुन त्यांना तात्काळ आर्थिक मदत करायला हवी.जेणे करून ते कुटुंब सावरेल.

दि.८ एप्रिल २०२३ शणिवार रोजी केज तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात जोरदार अवकाळी पावसाने झोडपले असुन या पावसाने हाताशी आलेली सर्व रब्बी पिके, गहु ज्वारी, मिरची, टरबुज, खरबूज या पिकाचे होत्याचे नव्हते केले. आहे. अनेक जणांना राहायला घर देखील शिल्लक राहिले नाही. काही शेतकरी या अवकाळीचे बळी ठरले आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. त्यावर आमदार नमिता मुंदडा यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सुचना केल्याने दि. ९ एप्रिल रविवार रोजी शासनाचे अधिकारी यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी दिल्या. आणि नुकसानीची पहाणी केली. परंतु नुसती पहाणी करुन काय त्या बाधित शेतकऱ्यांचे पोट भरणार नाही.या अवकाळीने भयभीत झालेले शेतकऱ्यांचे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहेत. ते झालेल्या नुकसानीला पाहुन हंबरडा फोडत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थिक मदतीची गरज असुन फक्त पहाणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना शासनाने भरीव आर्थिक मदत करावी. अशी मागणी छावा संघटनेचे बिडजिल्हा अध्यक्ष मा.श्री.शिवाजी (दादा) यांनी प्रशिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!