आपला बीड जिल्हाशेतकरी

बजरंगाची कमाल …..!

येडेश्वरी शुगरचा २५ रु. प्रमाणे तिसरा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा

शेकऱ्यांची दिवाळी; शेतकरी पुत्राच्या येडेश्वरीने गोड केली……

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

शेतकऱ्यांच्या उसाला सर्वात जास्त भाव देणारा कारखाना म्हणून ख्याती असलेल्या शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांच्या येडेश्वरी शुगरचे २५ रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा करून ऊस उतपादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.

 शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांच्या आनंदगाव (सारणी) ता. केज येथील येडेश्वरी साखर कारखाना युनिट क्र.१ ने सन २०२१-२२ मध्ये गाळप केलेल्या उसाला पहिला हप्ता २१०० रु. प्रमाणे, दुसरा हप्ता ४०० रु. प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्वीच जमा केला आहे. आता दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून येडेश्वरीने तिसरा हप्ता २५ रु. प्रति टना प्रमाणे दि. १४ ॲाक्टोबर २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे.

आत्ता पर्यंत बीड जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकविलेल्या उसाला सर्वाधिक म्हणजे २ हजार ५२५ रु. प्रति टन भाव येडेश्वरी शुगरने दिला आहे.

या वर्षीच्या गळीत हंगामात बजरंग सोनवणे यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, कारखाना कर्मचारी, ऊसतोड मुकदम, कामगार व वरुणराजाच्या आशिर्वादाने पुढील हंगामात देखील उच्चांकी भाव देण्याचे उद्धिष्ट आहे. ते पूर्ण करणारच असा संकल्प केला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!