आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केज बीड रोडवर आज्ञात वाहनाने मोटर सायकल स्वरास पाठीमागुन दिली धडक; १७ वर्षाच्या युवकाचा मृत्यु

गावावर पसरली शोककळा; दुपारी १.३० वाजता झाला अतिमसंस्कार

वादळवार्ता/ केज

या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील उमरी गावातील सुंदर ज्ञानोबा सोनवणे यांचा मुलगा नागनाथ सुंदर सोनवणे हा दि.२१ नोव्हेंबर २०२३ रोजी उमरी येथुन केजकडे सांयकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान येत असताना केज – बीड रोडवर असणाऱ्या शारदा इंग्लिश स्कूल समोर एका आज्ञात वाहणाने पाठीमागुन धडक दिल्यामुळे तो रस्त्याच्या बाजुस असणाऱ्या गड्ड्यात मोटार सायकल सोबत पडुन गंभीर जखमी झाला असता केज कड़े गेलेला मित्र वापस कसा येईना ? म्हणुन त्यांचा शोध घेत त्याचे मित्र केजच्या दिशेने येत असता त्यांना मयत नागनाथ सुंदर सोनवणे याची चप्पल दिसली त्याचा शोध घेतला असता तो खड्ड्यात पडलेल्या अवस्थेत निर्देशनास आला त्यास तात्काळ मोटारसायकल वरुण उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले परंतु तो गंभीर जखमी असल्याने त्याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाई येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. त्यानंतर दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर उमरी गावामध्ये शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.

त्याच्या परिवारासंबंधी माहिती घेतली असता तो सुंदर ज्ञानोबा सोनवणे यांना एकुलता एक मुलगा व तीन मुली असल्याचे समजते सुंदर ज्ञानोबा सोनवणे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अपे रिक्षावर चालतो अशी माहिती मिळाली.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!