केज | प्रतिनिधी
मा. पोलीस अधीक्षक बीड व मा. अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली केज शहरात अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या ठिकाणी कल्याण मटका खेळणाऱ्यांना रंगेहाथ पकडले.दि.14 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या कारवाईत श्री. वेंकटराम (भापोसे) यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोउपनि संजय फड, पोह/2011 अशोक खेलबुडे, पोह/1598 उत्रेश्वर केदार व पोअं/2097 कुलदीप खंदारे यांच्या पथकाने वसुंधरा बँकेच्या मागील बंद खोलीवर छापा टाकला.
पहिली कारवाई : पहिल्या छाप्यात शिवराज भगवानराव पाटील (वय 40, धारूर रोड, केज) व शेख शकील महेमुद (वय 42, रोजा मोहल्ला, केज) हे दोघेही कल्याण मटका खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून रु. 89,960/- नगद, मोटरसायकल, मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोह/2111 अशोक खेलबुडे यांच्या फिर्यादीवरून शिवराज पाटील, शेख शकील महेमुद, गणेश खराडे व शेख चंद सेठ (रा. केज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई : दुसऱ्या छाप्यात एकजन विनापरवाना बेकायदेशीर कल्याण मटका खेळताना मिळून आला. त्याच्याकडून रु. 16,390/- नगद, मोबाईल फोन व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोउपनि संजय फड यांच्या फिर्यादीवरून एकजनावर व गणेश खराडे (रा. केज) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक बीड, मा. अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वेंकटराम (भा.पो.से.) यांच्या आदेशाने अंमलात आणली. पथकात पोउपनि संजय फड, पोह/2011 अशोक खेलबुडे, पोह/1598 उत्रेश्वर केदार व पोअं/2097 कुलदीप खंदारे यांनी विशेष मेहनत घेतली. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेविरोधात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आणखी कारवाया करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!