वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील टाकळी येथून शेतातील काढणी करून ठेवलेले सोयाबीन एकाने चोरून नेले असून या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:०० वा. च्या सुमारास बळीराम यशवंत घुले रा. टाकळी यांनी त्यांच्या कुंभारपट्टी नावाच्या शेतातील एक बॅग पेरणी केलेले सोयाबीन हे कापणी करून ठेवलेले असताना हनुमंत ज्ञानोबा घुले रा. टाकळी याने चोरून नेले. ते चोरून नेत असताना साक्षीदारांनी पाहिले असता; त्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी बळीराम यशवंत घुले यांच्या तक्रारी वरून हनुमंत ज्ञानोबा घुले रा टाकळी ता केज याच्या विरुद्ध गु. र. नं. ४९३/२०२२ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दिलीप गित्ते हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!