वादळवार्ता – केज
दि.१४ केज – बीड रस्त्यावर अनिल भोजनालयच्या समोर आज्ञात कंटेनर चालकाने दोन गाईंना सांय 6.30 वाजता जोराची धडक देऊन पलायन केले . मात्र गाईचा जीव वाचविण्यासाठी तरुणाई पुढे आली.
सविस्तर वृत्त असे कि केज – बीड रस्त्यावर केज कडुन बीडकडे जात असलेले कंटेनरने अनिल भोजनालय समोर रस्ता ओलांडून जात असणाऱ्या दोन मध्यम स्वरुपाच्या गाईंना जोराची धडक देऊन पलायन केले. मात्र दोन गायीपैकी एक गाय रस्त्यावर पडुन होती तर दुसरी डिवाडर वर जखमी स्वरूपात उभी होती.
सदरील घटना पाहताच आजुबाजुला असणारे तरुण घटनास्थळी धावत आले आणी मुक्या प्राण्यांना अलगद उचलुन रस्त्याच्या बाजुला घेऊन गेले.
त्याच्यावर प्रथमउपचार केला तरुणांच्या समय सुचकतेमुळे त्या दोन्ही मुक्या प्रांण्याचा जीव वाचला.यामुळे या तरुणांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!