वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
दारू पाजून कुऱ्हाडीने व चाकुने वर करून रक्तबंबाळ केल्याची घटना केज पोलीस ठाणे हद्दीत घडली असून दोघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील एकुरका येथील विनोद अरुण केदार याला दि. १ फेब्रुवारी रोजी साहेबराव फुलचंद नागरगोजे याने दारू पाजून सायंकाळी ६:०० वा. च्या दरम्यान लाथाबुक्याने मारहाण केली. तसेच डोक्यात कुऱ्हाडीने मारुन रक्तबंबाळ करुन कुऱ्हाडीचे लाकडी दांड्याने पाठीत, हाताला, कंबरेला व मांडीला पायाला मारुन जबर मुक्का मार दिला आणि चाकुने उजव्या पायाच्या पोटरीत भोकसुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याच्या धमकी दिली.
या प्रकरणी विनोद अरुण केदार याच्या तक्रारी वरून दि. ४ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्यात साहेबराव फुलचंद नागरगोजे व त्याची पत्नी भाग्यश्री साहेबराव नागरगोजे यांच्या विरुद्ध गु. र. नं. ६२/२०२३ भा. दं. वि. ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक उगलमुगले हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!