केज येथे चोरट्याने किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडूननगदी १५ रु. सह ५७ हजाराच्या किराणा किराणा सामानाची चोरी केली.
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज येथे शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान कानडी रोडवरील वसंत महाविद्यालया समोरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा शेजारी अरविंद सुभाष चाळक यांचे अजय अमर मिनी मार्केट हे किराणा सामानाचे दुकानाचे; अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून आतील किर्ती गोल्डगोडे तेलाचे १० बॉक्स, साखरचे ५ कट्टे, कोलम तांदळाचे १० कट्टे, पराशुट तेल ८ बॉक्स, शेंगदाने २ कट्टे, अंगाच्या व कपड्याच्या साबण, व्हील, निरमा डिटरजन पावडर आणि दुकानात ठेवलेले नगदी १५ हजार रु असा एकूण ५७ हजार रु. ची चोरी केली आहे.
या प्रकरणी अरविंद चाळक यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु र नं ४७८/२०२२ भा दं वि ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी हे करीत आहेत.