वादळवार्ता वार्तांकन – केज
केज तालुक्यातील विडा येथील एका 9 वर्षाच्या चिमुकलीचा खदानित पाय घसरुण पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि दि 20 अक्टोबंर रोजी 15. 25 वा केज तालुक्यातील विडा येथील शिवारातील खदाणीमध्ये अनिता किसन आंधळे हिचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडुन मृत्यु झाला आहे . म्हणुन केज पोलीस ठाणे येथे 58 / 2022 प्रमाणे कलम 174 सीआर पी सी प्रमाणे आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे .
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोशि. मुंडे हे करत आहेत.