वादळवार्ता – केज
केजच्या विकासाच्या आणी नागरीकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने केज शहराच्या विकासाच्या आड येत असलेल्या अनाधिकृत अतिक्रमणावर बुलडोजर फिरवण्यास कर्तव्यदक्षता दाखविल्यामुळे प्रशासनाचे नागरीकांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.
खरे पाहिले तर ग्रामपंचायत अस्तित्त्वात असताना केज शहराला अतिक्रमणाचा विळखा अल्प प्रमाणात होता. परंतु जशी ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली हा विळखा हळु हळु वाढु लागला आणी तो इतका वाढला कि कोट्यावंधीच्या इमारती सुद्धा दिसेनाश्या झाल्या . त्यामध्ये केज तहसिल कार्यालय, पंचायत समीती , तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय , एस.टी स्टॅन्ड , इत्यादी. ग्रामीण भागातील लोकांना त्यांची कामे करण्याकरिता शासकीय इमारती विचारत विचारत जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण झाल्यानंतर तर पाठीमागील एक वर्षापासुन अतिक्रमणाच्या जागेवर मजबुतीकरण म्हणजे अनाधिकृतपणे बांधकाम सुरु झाले. यामध्ये मात्र केज नगरपंचायतीने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केला नाही. राष्ट्रीय महामार्गाचे शहरामधुन चौपदरीकरण झाले खरे परंतु फुटपाथ नसल्यामुळे व वाहने रस्त्यावर उभी करत असल्यामुळें सर्वसामान्य नागरीक रस्त्या मधुनच वाट काढत आपली कामे करू लागली . यामुळे मोठ्या प्रमाणात आपघाताचे प्रमाण वाढले . शिक्षणासाठी केज तालुक्यातुन शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील रस्त्याने चालायचे एक आव्हानच आहे. दरम्यान बीड जिह्याला कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी जिह्यातील वेगवेगळ्या मोहिमा हातामध्ये घेतल्या. त्याच धरतीवर केज शहारातील अतिक्रमण हाटाव मोहिम हाती घेतल्यामुळे जर मोहिम यशस्वी झाली तर केज शहर मोकळा श्वास सोडेल यात शंका नाही.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!