पिंपरी दि. 18 (प्रतिनिधी)
आदर्श माध्यमिक विद्यालय जेबापिंपरी या शाळेत शैक्षणिक वर्ष 2003-2004 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या बॅचच्या विद्यार्थी वर्ग मित्र-मैत्रिणींनी 21 वर्षा नंतर एकत्र येऊन गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आणि माध्यमिक या कालावधीतील शिक्षण त्यांच्या जीवनातील पायाभरणीचा कार्यकाळ असतो. या काळातील शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांची वेगळी जवळीक असते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी त्यावेळी शिकवण्यासाठी असणाऱ्या शिक्षकवृंदांना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद व्यक्त करत उत्साहात कार्यक्रम साजरा केला. येथील जिल्हा परिषद शाळा आणि आदर्श माध्यमिक विद्यालय जेबापिंपरी या शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेत गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक बाबासाहेब चव्हाण सर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. श्रीमंत चौधरी सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चंद्रशेखर कदम सर, श्री. रविंद्र करांडे सर, जोगदंड मामा यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. रविंद्र करांडे सरांनी शाळेतील जुन्या आठवणी ताज्या करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर श्री. चंद्रशेखर कदम सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मला अनेक गेट टुगेदर च्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. परंतु माझ्यासाठी हा कार्यक्रम अविस्मरणीय आहे. कारण या बॅचच्या विद्यार्थ्यांबरोबर माझे आगळेवेगळे नाते आहे. आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असल्याचे पाहून आणि तुम्हाला सर्वांना भेटल्यानंतर आपल्या आई-वडिलांना आपल्या पाल्याला भेटल्यानंतर जेवढा आनंद होतो. तेवढाच आनंद आज मला तुम्हाला भेटून होत आहे. प्रत्येक शिक्षकांसाठी आपला विद्यार्थी ज्या क्षेत्रात कार्यरत त्या क्षेत्रात उत्तम काम करत आहे. या पेक्षा वेगळा आनंद काय, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी कदम सरांनी विद्यार्थ्यांचा एक तास घेत गणित विषयाच्या एका पाठाची ओळखही विद्यार्थ्यांना करून दिली. पुढे जेष्ठ शिक्षक बाबासाहेब चव्हाण सरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छापर आशिर्वाद दिले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना श्री. श्रीमंत चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ते म्हाणाले की, अशा कार्यक्रमाच्या आयोजनामुळे आपल्या क्षेत्रात कार्यरत असणारे विद्यार्थी एकत्र येतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट काम करण्यासाठी नवउर्जा निर्माण होत असते. माझ्यासाठी तुमची बॅच खास आहे. तुमच्या वर्गातील सर्वच विद्यार्थी गुणी आहेत. आजच्या विद्यार्थांनमध्ये आणि तुमच्यामध्ये वेगळेपण आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून समाधान वाटले, अशा भावना व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपण सद्या काय करत आहोत हे सांगीतले. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षकांचे किती महत्त्वाचे स्थान आहे, हे सांगत शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन अतिशय आनंदात साजरा केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत जोगदंड यांनी केले. तर सुत्रसंचलन आणि शेवटी आभार बप्पासाहेब हावळे यांनी मानले. या कार्यक्रमाला अशोक ढास, अविनाश शिंदे, सचिन चौधरी, अमोल चौधरी, अंकुश फाटक, दिगंबर पोकळे,मोहन काटेकर, नितीन नाईकवाडे,सुकमल देवगुडे, आम्रपाली शिंदे, अर्चना वाघ,सरिता लहाने,कोमल देवगुडे, कीर्ती जगदाळे,विद्या मंचुके,सुषमा शिंदे, अर्चना निर्मळ आदी विद्यार्थी उपस्थित होते.