आंदोलनआपला जिल्हाआपला बीड जिल्हाआपले केज

आंदोलकांवर अमानुष लाठी चार्ज प्रकरणी केजमध्ये कडकडीत बंद

दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करा - मराठा क्रांती मोर्चा

केज बंदला व्यापारी देत आहेत मोलाची साथ

वादळवार्ता – केज

जालना जिल्हयातील अंतरवली-सरोटा येथे मराठा समाज बांधव आपल्या न्याय व हकाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने व शांततेत उपोषण आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने राज्य प्रशासनाच्या सुचनेवरून या आंदोलकांवर अमानुष लाठी चार्ज करून ते अंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला असुन या पोलीसांच्या लाठीचार्ज मध्ये अनेक महिला व पुरुष नागरीक गंभीर जखमी झाले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सरोटा येथील पोलीस प्रशासनाने केलेल्या लाठी चार्ज मध्ये दोषी प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्यात यावी. या मागणीसाठी बीउ जिल्हा क्रांती मोर्चा व सकल मराठा/बहुजन समाजाच्या वतीने केज सह बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे. या बंद मध्ये सहभागी होवून केज तालुका क्रांती मोर्चा । सकल मराठा बहुजन समाज या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून दोषी प्रशासकीय अधिकार्‍यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाने या बाबीची दखल घेवून कार्यवाही न केल्यास केज तालुका क्रांती मोर्चा / सकल मराठा। बहुजन समाज तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे निवेदनावर म्हटले आहे. सदरील निवेदनावर सामाजीक कार्यकर्ते हनुमंत भोसले, बी.जे. देशमुख , बाळासाहेब यादव, आदेश देशमुख , शेकापाचे नेते भाई मोहन गुंड , विजय वाडळे , बाळासाहेब खुणे , अभिजित सत्त्वधर, रवि बोबडे , प्रमोद शिंदे, सुग्रीव मोरे , शिवाजी साखरे , दिलीप तपसे , मंगेश कदम , विरेंद्र जोगदंड , तुषार पवार याच्यासह अनेक अंदोलन कर्त्याच्या सह्या आहेत . तसेच केज बंदच्या हाकेला धावत केज शहरातील व्यापार्‍यांनी दुकाने बंद करून प्रतिसाद दिला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!