आपला बीड जिल्हा

पुणे येथे होणार्या अधिवेशनास पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – रामदास तपसे

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष शरद पाबळे यांचा मार्गदर्शनाखाली मराठी पत्रकार परिषदचे ४३ वे राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे दिनांक १९ आणि २० नोव्हेंबर रोजी होत आहे या अधिवेशनास केज तालुक्यातील पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष रामदास तपसे यांनी केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,प्रत्येक दोन वर्षांत मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन होत असते.या राष्ट्रीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील तमाम पत्रकारांसाठी एक खास मेजवानी असते.गत राष्ट्रीय अधिवेशन नांदेड नगरीत पार पडले.मध्यांन्तरी कोरोना या महाभयंकर संकटामुळे हे अधिवेशन घेता आले नाही.आता मात्र सर्व वातावरण स्वच्छ सुंदर आणि निरोगी दायी असल्याने मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे हे राष्ट्रीय अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला.मराठी पत्रकार परिषदेची महाराष्ट्र राज्य स्तरीय टीम या कामी लागली असुन पुणे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य हे अधिवेशन आगळे वेगळे करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.हे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन येत्या १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ पुण्यातील पिंपरी चिंचवड मधील शंकरराव गावडे भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते,जेष्ठ पत्रकार यांचे अनमोल विचार ऐकावयास मिळणार आहेत.त्याच बरोबर मराठी पत्रकार परिषदेने डिजिटल मिडिया परिषद हे नवीन विंग सुरू केले आहे. राज्याचे प्रमुख अनिल वाघमारे हे मा एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम असे कार्य करत आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेची मोठी टिम तयार केली आहे.

डिजिटल मिडिया परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांना या अधिवेशनात एक अनौखा अनुभव घेता येणार आहे.राज्य भरातील विविध न्यूज चॅनलचे ऍन्कर आपला प्रवास आणि अनुभव त्याचबरोबर यु ट्यूब चॅनल,पोर्टल चालकांना एक वेगळं प्रशिक्षण घेता येणार आहे.याच बरोबर या राष्ट्रीय अधिवेशनात अनेक प्रसिद्ध मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख हे या अधिवेशनात पत्रकारांचे प्रश्न व त्यावरील पुढील दिशा व काहीं ठराव निश्चिती करणार आहेत.आपणही आपला सहभाग या अधिवेशनात घ्यावा. तरी या अधिवेशनास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आवाहन मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मिडीया पत्रकार संघाचे केज तालुका अध्यक्ष रामदास तपसे यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!