केज । प्रतिनिधी
विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपली वेगवेगळ्या संस्थांनी आपआपले पोल जाहिर केले . कोणी महाविकास आघाडी तर कोणी महायुती मात्र खराखुरा जनतेचा पोल हा २३ नोव्हेंबरलाच जाहीर होणार आहे. तसे पाहीले तर बहुतांश पोल हे सपशेल नापास झालेले असल्याचे या अगोदरच्या निवडणुकीत महाराष्ट्राने वा देशाने पाहिले आहेत.
तसे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणुक जागोजागी चुरशीची झाल्याचे दिसून येते त्यामध्ये बीड संवेदनशील असणारा बीड जिल्हा कसा सुटेल बीड, गेवराई ,माजलगाव ,आष्टी , परळी आणि केज अगदी चुरशीचे लढती या ठिकाणी पहायला मिळाल्या त्यामध्ये केज विधानसभा हा मतदारसंघ अनुसुचीत जाती करीता राखीव असणारा तसेच एकेकाळी स्व. विमलताई मुंदडा यांचे वर्चस्व असणारा मतदार संघ स्व. विमलताई मुंदडा यांनी केज- अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघात काम करत असताना विविध जातीचे अनेक नेते तयार केले. नव्हे तर त्या आजच्या नेत्यांच्या गुरुच म्हणाव्या लागतील त्यांच्या निधनानंतर नंदकिशोर मंदडा व त्यांचा मुलगा अक्षय मुंदडानवर हि जिम्मेदारी आली आणि त्यांच्याच तालमीत तयार झालेले पृथ्वीराज साठे हे आमदार झाले. मात्र यांचेही जास्त दिवस न जमल्यामुळे यांनी मुंदडा घरण्याची फारकत घेतली. आज २०२४ केज विधानसभा मतदार संघात मुंदडा विरुद्ध साठे म्हणजेच गुरु विरुद्ध शिष्य असा सामना पहावयास मिळाला. या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे मात्र या लढतीत गुरु बाजी मारणार की शिष्य हे पाहणे गरजेचे आहे. जर गुरुने बाजी मारली तर समजून जायचे कि ” गुरु हाचा राखुन होता आणि जर शिष्यांने बाजी मारली तर समजायचे शिष्य गुरूपेक्षा चपळ होता.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!