आपला बीड जिल्हाराजकारण
परळीत खा.सोनवणेंचा मास्टरस्ट्रोक; मुंडेंना धक्का देत माजी नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी घेतली हाती

बीड । प्रतिनिधी
परळीत मुंडेंच्या एकाधिकारशाहीला सूरूंग लावण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी नवनवीन डाव टाकायला सुरूवात केली असून आ.मुंडे यांचे सहकारी तथा परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमूख आणि पत्नी संध्याताई देशमूख यांनी दि.१० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (शरद पवार गट) प्रवेश केला. सदरील प्रवेश पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. परळीत आ.धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी सुरूवात केलेली आहे.नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गट ताकदीने उतरणार असल्याने शहरातील मात्तबर मंडळी मुंडेंना सोडून पर्यायाची चाचपणी करत आहे. ज्यांना शहराचा विकास व्हावा, असे वाटत आहे, अशी मंडळी मुंडेंपासून दूर होवू लागली असून यात माजी नगराध्यक्ष दिपक देशमूख, त्यांच्या पत्नी संध्याताई देशमूख यांनी खा.बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज मुंबईत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आ.जितेंद्र आव्हाड, पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड यांची यांची उपस्थिती होती. दिपक देशमूख हे परळीच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांनी परळीचे नगराध्यक्षपदही भुषविलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात परळी शहरात मोठ्या प्रमाणात दर्जेदार विकास कामेही झालेली आहेत. दरम्यान, प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना दिपक देशमूख म्हणाले, येथील आमदार सत्ताधाऱ्यांचे काम पाहिले तर कोणतेही विकास काम त्यांनी केलं नाही. जे काही कामे केली त्यात भ्रष्टाचार करण्यात आला. आम्ही वारंवार ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातल्यावरही यावर कुठला मार्ग निघाला नाही. परळीतील अर्धवट विकास कामे यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सहा महिन्यापासून मी या कामाला लागलो होतो. मी लोकसभेला पंकजा मुंडे यांचे काम केले त्यानंतर विधानसभेला धनंजय मुंडे यांचे काम केले, असेही ते म्हणाले.
दिपक देशमूख हे परळीचा विकास व्हावा, यासाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटात आलेले आहेत. परळीत कुणाची किती ताकद आहे, ते आता कळणार असून परळीचा गड आम्ही राखू. परळीत सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित बसवून परळी नगर पालिकेचा उमेदवार ठरवला जाणार आहे.
खा.बजरंग सोनवणे, बीड.



