आपला बीड जिल्हाआपले केजशिक्षण

केजमध्ये १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना खासगी क्लासमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या २०२४ च्या नियमांचे सर्रास उल्लंघन;पालकांची लूट सुरूच ना पावती, ना रसीद

केज | प्रतिनिधी

केज शहरात शिक्षणाच्या नावाखाली खुलेआम नियमांचे उल्लंघन सुरू असून, काही खासगी कोचिंग क्लासेसकडून १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना बेकायदेशीररित्या प्रवेश देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२४ मध्ये जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार, १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोणत्याही खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देणे बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.परंतु, केज शहरात अनेक क्लासेस हे नियम पायदळी तुडवत आहेत. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना एकाच हॉलमध्ये मोठया संख्येने वर्ग घेतले जातात, ना विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था ना सोईसुविधा मात्र पालकांकडून भरमसाठ फी वसूल केली जाते. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे अनेक क्लासेसकडून पालकांना फीची पावती अथवा कोणतीही अधिकृत रसीद दिली जात नाही. त्यातच चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावुन विद्यार्थी तथा पालकांना आकर्षित केली जात आहे .तसेच काही क्लासेसमध्ये तर चक्क पदवीधर नसलेले शिक्षक व काही शासकीय शिक्षक देखील शिकवणी घेतात यामुळे की शहरात शिक्षणाचा बाजार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

पालकांच्या भावना “हे शैक्षणिक नव्हे तर फसवणूक आहे”अनेक पालकांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “क्लास सुरू होण्याआधीच आमच्याकडून पैसे घेतले जातात. कोणतीही पावती मिळत नाही. जर काही समस्या उद्भवली, तर आमच्याकडे काही पुरावा देखील राहत नाही.”

काय आहे केंद्र सरकारची नियमावली?केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने कोचिंग क्लासेसवर अंकुश ठेवण्यासाठी  नियम १ ) १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे पूर्णपणे बंद.२ )कोचिंग क्लासमधील शिक्षक पदवीधर असणे अनिवार्य.३ ) फी, अभ्यासक्रम, शिक्षकांची माहिती संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर स्पष्टपणे नमूद असावी.४ ) विद्यार्थ्यांची नोंदणी बंधनकारक.५ ) कोणतीही गारंटी, दिशाभूल करणारी जाहिरात करता येणार नाही. ६) विद्यार्थ्यांवर अनावश्यक शैक्षणिक दबाव टाळण्याच्या सूचना.

कोण घेतो जबाबदारी?या नियमांचे उल्लंघन होऊनही केजमधील स्थानिक प्रशासन किंवा शिक्षण विभाग यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा कोचिंग क्लासेसना बळ मिळत असून, शिक्षणाचे व्यापारीकरण आणि विद्यार्थ्यांचे नुकसान याला खतपाणी घातले जात आहे.

सामाजिक संस्थांची मागणी “तत्काळ कारवाई करा”स्थानिक शिक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व पालकवर्ग यांच्यातून एकच आवाज उठतो आहे — “शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या कोचिंग क्लासेसवर कारवाई केली पाहिजे. नाहीतर हे बेकायदेशीर शिक्षण केंद्रं उद्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे नुकसान करू शकतात.”

शेवटी प्रश्न एकच शिक्षण की शोषण?शासनाने निश्चित केलेल्या नियमांचा अवमान करत, फक्त नफ्याच्या हव्यासापोटी चालणाऱ्या कोचिंग क्लासेसमुळे विद्यार्थ्यांचे बालपण, त्यांचे आरोग्य, आणि त्यांच्या शिक्षणाचा दर्जा यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासन जागे होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!