वर्गणीची जबरदस्ती आणि मिरवणुकीत डीजे वाजविल्यास होणार कठोर कारवाई
वादळवार्ता – गौतम बचुटे
धार्मिक सण किंवा उत्सव साजरे करीत असताना वर्गणीची सक्ती अगर जबरदस्ती केल्याच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करण्यात येणार असून डी जे वाजविल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिले आहेत.
धार्मिक सण, उत्सव आणि महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करीत असताना वर्गणी जमा करीत असताना कोणी व्यापारी किंवा व्यक्तीवर सक्ती किंवा बळजबरी केल्यस त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे तसेच मिरवणुकीत जर कोणी डी जे वाजवून ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर आणि उत्सव मंडळांचे पदाधिकारी यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी कळविले आहे. वर्गणी मागताना नागरिक आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्यावर बळजबरी होत असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच डी जे संदर्भातही नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधल्यास कारवाई केली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!