वादळवार्ता – केज
केज येथील आदर्श पत्रकार संघ, सक्रिय पत्रकार संघ, झुंजार पत्रकार संघ, पुरोगामी पत्रकार संघ, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ, स्वाभिमानी पत्रकार संघ, डिजिटल मिडीया मराठी पत्रकार संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावर दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उदघाटन केज शहर व तालुक्यातील सर्व अधिकारी व पद अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे,
दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी ‘पत्रकारितेतील नवे प्रवाह’ या विषयावरील ही कार्यशाळा केज येथे होणार आहे . या कार्यशाळा संबोधित करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विलास बडे ज्ञानदा कदम, सुशिल कुलकर्णी, , प्रभाकर सुर्यवंशी, माहिती अधिकारी किरण वाघ साहेब, एस एम देशमुख व जिल्ह्यातील संपादक, पत्रकार व केज, अंबाजोगाई, धारूर तालुक्यातील सर्व पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत ,माध्यमातील नव्या प्रवाहाबाबत कार्यशाळा पत्रकार आणि पत्रकारितेचे प्रतिनिधी यांच्यासाठी खुली आहे. या कार्यशाळेत जास्तीत जास्त पत्रकार आणि पत्रकारितेच्या संबंधित व्यक्तीनी सहभागी व्हावे असे आवाहन केज येथील सर्व पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी केले आहे
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!