आपला बीड जिल्हा

केज नगरपंचायतच्या सत्ताधार्‍यांना वैतागुन नगरसेविकेने स्वखर्चातुन बोअरवेल केला दुरुस्त!

वादळवार्ता वार्तांकन – मुबोशिर खतीब

केज नगरपंचायतच्या कारभाराला वैतागुन , स्वखर्चातुन प्रभागातील बोअरवेल दुरुस्त केले यापुढे प्रभातील जो शक्य आहे तो विकास स्वखर्चातून करणार, मंत्रालयीन पाठपुरावा करणार – इनामदार तरमिमबेगम गजमफर नगरसेवीका न.प.केज

सविस्तर वृत्त असे केज नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेवीका इनामदार तरमिमबेगम गजमफर या प्रभागामधील अनेक आसणाऱ्या समस्या केज नगरपंचायतच्या प्रशासनासमोर वारंवार मांडत होत्या सत्ताधार्‍याना सांगत होत्या परंतु त्यांच्या प्रभागातील समस्या सोडवण्यास ना प्रशासन तयार होते ना सत्ताधारी म्हणुन अखेर नगरपंचायतच्या कारभाराला वैतागुन त्यांनी केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्या नावे एक तक्रार निवेदन देऊनदेखील कोणत्याही प्रकारच्या समस्येचे निराकरण झाले नाही म्हणुन आपल्या प्रभागातील बंद पडलेले बोअरवेल स्वखर्चातुन दुरूस्त करुण प्रभागातील पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे प्रभागातुन तथा केज शहरातुन अभिनंदन केले जात आहे.

केज शहरातील प्रत्येक वार्डामध्ये समस्या हळुहळु वरती तोंड काडु लागल्या आहेत जर प्रत्येक वार्डातील नगरसेवकानी बंड करुण वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला तर मोठया प्रमाणात केज शहराचा विकास साध्य करता येईल

पप्पु आण्णा इनामदार

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!