वादळवार्ता वार्तांकन – केज
तालुक्यातील साळेगाव येथे एका महिला शेतकऱ्यांच्या गाईला लंपीची लागण झालेली आहे.
साळेगाव तालुका केज येथे महिला शेतकरी सुरेखा राजाभाऊ वरपे यांच्या जर्सी गाईला लंपीची लागण झालेली आहे. साळेगाव मधील लंपी आजाराचा हा पहिला रुग्ण असून लंपीग्रस्त गाईवर पशुधन पर्यवेक्षक गिरी हे उपचार करीत आहेत. दरम्यान साळेगाव येथे लंपीचा रुग्ण आढळल्याने गावात आणि परिसरात पशुपालकात भीतीचे वातावरण पसरले आहे.