वादळवार्ता वार्तांकन – मुबशिर खतीब
माझ्या शेतात म्हशी चारू नका असे म्हणताच मारहान करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथेल शेतकरी राजेभाऊ दादाराव चौरे वय वर्ष 51 व्यवसाय शेती रा. जिवाचीवाडी दि.26 अक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता घराच्यासमोरून संदीप राजेभाऊ चौरे, लुकेश राजाभाऊ चौरे , राजाभाऊ बापुराव चौरे ,लक्ष्मण बारीकराव चौरे सर्व राहणार जीवाचीवाडी हे जात असताना राजेभाऊ दादाराव चौरे यांनी माझ्या शेतात म्हशी चारू नका असे म्हणताच तु आम्हाला असे का म्हणालाच असे म्हणत संगणमत करून संदीप राजेभाऊ चौरे, लुकेश राराजाभाऊ चौरे , राजाभाऊ बापुराव चौरे ,लक्ष्मण बारीकराव चौरे यांनी राजेभाऊ दादाराव चौरे यांना शिवगाळ करत कुऱ्हाडीच्या दांड्याने हातावर, कंबरेवर , मांडीवर मारून मुकामार दिला तसेच जर तु आमच्या विरुद्ध पोलीसात तक्रार दिली तर तुला आम्ही जिवच मारून टाकु म्हणुन संदीप राजेभाऊ चौरे, लुकेश राजाभाऊ चौरे , राजाभाऊ बापुराव चौरे ,लक्ष्मण बारीकराव चौरे यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात 488/2022 कलम 324,323,504,506,34 भादंवि. प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पो.ना. सोनवणे करत आहेत.