आपला बीड जिल्हासामाजीक

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात सहभागी व्हा…हनुमंत भोसले

वादळवार्ता – बीड

सध्याची सामाजिक स्थिती पाहता भ्रष्टाचार किंवा इतर क्षेत्रापेक्षा अंधश्रद्धेद्वारे होणारे समाजाचे शोषण ही खूप मोठी गंभीर समस्या असल्याने या क्षेत्रात काम करण्यासाठी समाजप्रेमी युवक-युवती,महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी केले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन कार्याबद्दल कांही मनुवादी व अंधश्रद्धेचे लाभार्थी लोक समाजात गैरसमज पसरवताना दिसत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन कार्य हे कोणत्याही देव किंवा धर्म यांच्या अजिबात विरोधात नाही. सामान्य लोकांची देव किंवा धर्म विषयक श्रद्धेचा फायदा घेऊन विविध प्रकारे सामान्य लोकांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शोषण करणाऱ्या भोंदू व फसवेगिरी करणाऱ्या लोकांवर पुराव्याआधारे अंनिस विरोध व कार्यवाही करते. मात्र हेही कांही लोकांना नको आहे म्हणून असे लोक अंनिस बद्दल सामान्य जनतेत ते देवाच्या व धर्माच्या विरोधात असल्याचे चुकीच्या अफवा व प्रचार करून लोकांची दिशाभूल करत आहेत. खरे पाहता महाराष्ट्राचे थोर संत व फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचार धारेवर आधारित हे कार्य आहे. खरे पाहता राज्यात व देशात डॉक्टर व त्यांचे वैदयकीय क्षेत्र आणि आपल्या संस्था स्थापनेच्या उद्दीष्टयात अंधश्रद्धा निर्मूलन असे लिहीलेल्या सामाजिक संस्था अंधश्रद्धा निर्मूलनात सर्वात पुढे असणे अपेक्षित होते. मात्र असे होताना दिसत नाही.

बीड जिल्ह्यात महाराष्ट्र अंनिस चे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी या सामाजिक कार्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यात तालुका व प्रमुख सर्कल निहाय शाखा स्थापनेचा जिल्हा अंनिस ने निर्धार केला आहे. या शाखा स्थापन झाल्यानंतर बीड जिल्ह्यात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात कमी होईल.

तरी बीड जिल्ह्यात तालुका व सर्कल निहाय जे सामाजिक युवक-युवती व नागरिक अंधश्रद्धा निर्मूलन सारख्या क्षेत्रात काम करू इच्छितात त्यांनी बीड जिल्हा अंनिस च्या 9423733888 किंवा 7972058885 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!