आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

आयपीएस कमलेश मीना यांच्या पथकाची दबंग कारवाई

गोवंश जातीची जनावरे गुलाल टाकून कत्तलखान्यात नेणाऱ्या वाहनावर धाड !

९ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ; ०३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

वादळवार्ता/केज

आयपीएस कमलेश मीना यांच्या पथकाची दबंग कारवाई करत गोवंश जातीची जनावरे कत्तलखान्यात नेणाऱ्या वाहनावर धाड टाकून एकुन ९ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ०३ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि दिनांक ३०/०४/२०२४ रोजी पाहटे ०३ वाजण्याचे सुमारास सहा. पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग केज यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक आयशर पासींग क्रमांक एम.एच. ०४ ई.एन.३७३५ यामध्ये गोवंश जातीचे जनावरे भरुन ती कत्तलीसाठी बेकायदेशिर रित्या केज येथुन अंबाजोगाई कडे अवैद्य वाहतुक करित आहे. अशी माहिती मिळाल्यावरुन सहा. पोलीस अधीक्षक, श्री. कमलेश मीना यांनी पथकातील दिलीप गित्ते, पोलीस नाईक विकास चोपने, अनिल मंदे, पोलीस ठाणे केज येथील चापोह/८५८ दराडे, पोना/१८३० भंडाणे यांना सदर वाहन ताब्यात घेवुन कायदेशिर कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने वर नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी पिसेगाव फाटा येथे थांबवुन पहाटे ५.३० वाजण्याचे सुमारास वर नमुद वाहन ताब्यात घेतले, वाहनाचे चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जाकेर खाजाभाई खुरेशी, वय-22 वर्ष, रा. विडा ता. केज जि. बीड असे सांगीतले तसेच सदर जनावरे कोणाच्या मालकीचे आहे याबाबत विचारणा केली असता सदरचे जनावरे हे दिलीप आश्रुबा घोरपडे,अप्पाराव दिलीप घोरपडे, दोन्ही रा. विडा ता. केज जि.बीड असे सांगीतले, पथकातील कर्मचारी यांनी सदरच्या वाहनाची पाहणी केली असता ११ खिलार जातीचे बैल व ०१ जर्सी जातीचे बैल असे होते. सदर गोवंश जातीतील जनावर हे शेती कामाचे व्यापारासाठी घेवुन जात असल्याचे दिसावे म्हणुन सदर जनावराचे अंगावर गुलाल टाकल्याचे दिसुन आले, सदरच चालक यास सदरचे जनावरे कोठे घेवुन जात आहात याबाबत विचारणा केली असता सदरचे जनावरे हे नळेगाव येथील बाजारात घेवुन जात असलेबाबत सांगीतले. त्यांना जनावराचे पावती/कागदपत्राविषयी विचारणा करता त्यांचेकडे कागदपत्र मिळुन आले नाही. वरील वर्णनाचे ११ खिलार जातीचे बैल व ०१ जर्सी जातीचे बैल गोवंश जातीचे जनावरे व आयशर सह एकुण ९ लाख ५८ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला. तरी यातील आरोपी क्रमांक ०१ ते ०३ हे गोवंश जातीचे जनावरे क्रुरतेने निर्दयीपणे क्षमतेपेक्षा जास्त भरुन आयशर टँम्पोमध्ये भरुन ते व्यापाराचे जनावर आहे असे दाखवण्यासाठी त्यांचेवर गुलाल टाकुन त्यांची कत्तल करण्यासाठी घेवुन जात असतांना मिळुन आल्याने वर नमुद आरोपीविरुध्द पोलीस नाईक दिलीप गित्ते यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे केज येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही श्री. नंदकुमार ठाकुर, पोलीस अधीक्षक, बीड, श्रीमती चेतना एस. तिडके, अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कमलेश मीना, सहा. पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांचे आदेशाने पोलीस नाईक दिलीप गित्ते, अनिल मंदे, विकास चोपने, पोलीस हवालदार दराडे, पोलीस नाईक भंडाणे यांचे पथकाने केली आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!