आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

गोटेगावातील अवैद्य वाळु साठ्यावर केज तहसिलदार अभिजीत जगताप यांची धाड !

सुमारे ५० ते ७० ट्रॅक्टरचा वाळुसाठा जप्त ; होतोय पंचनामा

दैनिक वादळवार्ता/ केज

केज तालुक्यातील गोटेगाव शिवारामध्ये सुमारे 50 ते 70 ट्रॅक्टरचा वाळूसाठा वाळू माफीयांनी जमा केला होता.त्यावरती केजचे तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार अभिजीत जगताप यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत सदरील वाळू साठ्यावर धाड टाकली. सदरील अवैद्य वाळू साठा गोटेगाव शिवारांमधील असून त्या वाळू साठ्याचा पंचनामा गोटेगावचे तलाठी खतीब तसेच मंडळ अधिकारी मस्के याच्यासह इतर महसुल कर्मचारी करत आहेत. महत्वाचे म्हणजे या धाडीवरून गोटेगावच्या पुलावरून दिवसा गाळ उपसा व रात्र झाली कि वाळू उपस्याची गावकऱ्यानं मध्ये जोराची चर्चा सुरु आहे. यामुळे वाळु माफियांचे धाबे चांगलीच दणाणले आहेत .

 

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!