वादळवार्ता – गौतम बचुटे
एसटी बस मधून खाली उतरताना एका वयोवृद्ध प्रवाशाला हृदयाविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला आहे.
या बाबतची माहिती अशी की वरपगाव येथील शेषराव नारायण बनसोडे वय (७५ वर्ष) हे मंगळवार दी. २४ जानेवारी रोजी वरपगाव-केज गाडीने क्र. (एम एच-३०/बी एल-०१२५) प्रवास करीत होते. ते ६:३० वा दरम्यान केज बस स्टँडवर उतरत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी गाडीचे वाहक तांदळे आणि चालक लोकरे यांनी ही माहिती तात्काळ वाहतूक नियंत्रक जगदीश चिक्ची यांना दिली. त्या नंतर जगदीश चिक्ची यांनी तात्काळ ही माहिती पोलीसांना देऊन आणि रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. तसेच यावेळी बस स्टँडवर उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रा. विनोद गुंड, चंद्रकांत मस्के, दिलीप गवळी आणि दिलीप बनसोडे यांनी त्यांना मदत केली.
दरम्यान मयत शेषेराव बनसोडे यांचा मुलगा संतोष बनसोडे हा कुटुंबासह उस तोडणी साठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यावर गेले असल्याने ते त्यांच्याकडे जाण्यासाठी केजकडे येत होते. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच वरपगाव येथील त्यांचे पुतणे माणिक बनसोडे यांनी केज येथे येऊन शेषेराव बनसोडे यांचा मृतदेह गावी घेऊन गेलेअसल्याची माहिती मिळाली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!