देवगाव, मांगवडगाव, हंगेवाडी येथे विज पडून जनावरे दगावले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड आणि झाडे पडली
वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यात आज दुपारी ३:०० वाजेच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली तर देवगाव, हंगेवाडी आणि मांगवडगाव येथे तीन ठिकाणी वीज पडून पाच जनावरे दगावले आहेत.
दि. ८ एप्रिल रोजी दुपारी २:३० ते ३:३० वा सुमारास केज तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह अवकाळी पाऊस पडला. केज तालुक्यातील नांदूरघाट, उत्तरेश्वर पिंप्री, शिरूरघाट, राजेगाव, नाव्होली, हादगाव डोका, मांगवडगाव, साळेगाव, माळेगाव, युसुफवडगाव, धनेगाव, कोरेगाव, कोठी, मस्साजोग, चिंचोली माळी, सुर्डी (सोनेसंगवी), लाखा, सोनेसांगवी, विडा या ठिकाणी वादळवारा आणि विजेच्या गडगडटासह गारपीट झाली. या गारपिटीने आंबा, भाजीपाला, फळभाज्या, टरबूज, झेंडू व मिरची यासह ज्वारी आणि गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
केज तालुक्यात तीन ठिकाणी वीज पडून पाच जनावरे दगावले
हंगेवाडी येथे वीज पडून शशिकांत संपत हांगे यांचा बैल आणि जयराम तुकाराम हांगे एक बैल एक गाय ही तीन जनावरे मृत्युमुखी पडले. तर देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे बैल दगावला आणि मांगवडगाव येथेह वीज पडून दत्तू मुळूक गाय दगावली आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!