आपला बीड जिल्हाब्रेकिंग न्युज

आरणगाव येथील तरुण बेपत्ता ; पत्नीची केज पोलीसात धाव

वादळ वार्ता वार्तांकन – महादेव काळे

पुण्यातील एका खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करणारा ४६ वर्ष वयाचा इसम बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केज पोलीस ठाण्यात दिली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील आरणगाव येथील नागनाथ जगताप हा पुणे येथील मातोश्री या खाजगी कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे. तो १५ ते २० दिवसा नंतर नियमित आरणगाव या त्यांच्या गावी कुटुंबात येत असे; परंतु दि. १४ जून रोजी तो कामाला गेला. त्या नंतर दि. २२ जून पर्यंत तो फोनद्वारे कुटुंबाच्या कायम संपर्कात होता.

मात्र त्या नंतर दि. २३ जून पासून त्याचा फोन आला नाही. आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे त्यांची पत्नी सौ. अनिता जगताप हिने पुणे येथील मातोश्री कंपनीत त्याची चौकशी केली असता नागनाथ जगताप आले नसल्याची त्यांनी माहिती दिली.

त्या नंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नारेवाडी, सादोळा, साळेगाव, पुणे आणि नातेवाईक असलेल्या परिसरात शोध घेतला असता ते अद्याप पर्यंत मिळुन आलेले नाही. म्हणून नागनाथ यांची पत्नी सौ. अनिता जगताप हिने दि. १४ जुलै रोजी केज पोलीस ठाण्यात नागनाथ जगताप बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे.

तक्रारीत त्यांनी नागनाथ जगताप यांचे वर्णन दिले असुन त्यात त्यांचा वर्ण सावळा, उंची ५ फूट ६ इंच, बांधा मध्यम, नाक सरळ, डोळे मध्यम, अंगात फिका गुलाबी रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट, पायात चप्पल आणि त्याला मराठी भाषा बोलता लिहिता व वाचता येते असे वर्णन केले आहे.

सदर वर्णनाचा इसम नागनाथ जगताप हा कुणास आढळून आला किंवा त्याच्या विषयी कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ केज पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!