वादळ वार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
शहरातील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयात १३ व १४जुलै रोजी महाविद्यालयाचे मूल्यांकन पूर्ण झाले नॅक कमिटीने महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सामाजिक , संशोधन याविषयी केलेल्या कामाचा अहवाल, प्रत्यक्ष पाहणीतून समाधान व्यक्त केले. लवकरच तपासणी अहवाल कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व प्रकारच्या पाहणीनंतर महाविद्यालयाच्या सर्व टीम चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मूल्यांकनातील विशेष बाबी व सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
नॅक कमिटी सदस्य प्राचार्य रचना दुबे वाराणसी, चेअरमन देवाशिष भट्टाचार्य आसाम ,सदस्य डॉ. नागाज्योती कोरीपेला तेलंगणा,यांचा कमिटी मध्ये समावेश होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव फावडे,महाविद्यालयीन नॅक समन्वयक प्रोफेसर डॉ नवनाथ काशीद व समन्वयक सदस्य प्रा डॉ संभाजी भंडे आदींनी मूल्यांकनात पुढाकार घेऊन सादरीकरण केले.मूल्यांकन प्रक्रिकेत सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!