आपला बीड जिल्हाक्राईम

केज-बीड रोडवर कार आडवी लावून कोयत्यांचा धाक दाखवून दागीने व रोख रकमेसह ७२ हजाराची लुटमार !

केज-बीड रोडवर कार आडवी लावून कोयत्यांचा धाक दाखवून दागीने व रोख रकमेसह ७२ हजाराची लुटमार !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

नातेवाईकांच्या मृत्यू नंतरचे रक्षा सावडण्याचा कार्यक्रम आटोपून नांदेड जिल्ह्यातील खतगाव येथून पुण्याकडे परत जात असलेल्या एका पिकअपला कार आडवी लावून धारदार कोयत्यांच धाक दाखवून महिलांचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ७२ हजार रु लुटली असल्याने प्रवाशांत भितीचे वातावरण पसरले आहे.

नांदेड जिल्ह्यातील खतगाव ता. मुखेड येथील धनाजी किसनराव भोसले हे खाजगी वाहन चालक असून त्यांचे पुणे जिल्ह्यातील कुरळी ता. खेड जि. पुणे येथे वास्तव्यास आहे. त्यांचे चुलते हे खतगाव जि नांदेड येथे मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी धनाजी भोसले हे त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकांसह पुण्याहून पिकअपने क्र. (एम एच-१२/ टि व्ही-३९०५ ) खतगावला २५ सप्टेंबर रोजी सकाळी आले होते. २६ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता रक्षा सावडण्याचा कार्यक्रम आटोपून ते परत त्याच पिकअपने धनाजी भोसले, त्यांची पत्नी अनुसया भोसले, मुलगा दत्ता भोसले, पुतणी अंबिका परशुराम यादव, शंकर जयसिंग भोसले, शंकर यादव, समर्थ शंकर यादव, माधव गोविंदराव टेकाळे, राम मारोती नखाते, विमलबाई गंगाधर घाटके हे सर्वजण पुण्याला परत जात होते. धनाजी भोसले स्वतः पिकअप चालवीत होते.

दरम्यान मंगळवार २७ सप्टेंबर रोजी पहाटे त्यांचे पिकअप हे केज – मांजरसुंबा रस्त्यावरील कोरेगाव फाट्या पासून थोड्या अंतरावार पुढे जात असताना पिकअपला एका सिल्व्हर रंगाची कार पुढे येऊन आडवी लावून त्यांना आडविले. कारमधून हातात कोयते असलेले २५ ते ३० वयोगटातील पाच दरोडेखोर खाली उतरले. त्यापैकी एकाने पिकअपची चावी काढून घेतली. तर उर्वरित चौघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवीत माधव टेकाळे यांच्या डोक्यात उलटा कोयता मारून जखमी करीत दहशत निर्माण केली. त्यांनी बळजबरीने धनाजी भोसले यांच्या जवळील नगदी ७ हजार रुपये, डायरी, आधारकार्ड, पॅनकार्ड, लायसन्स, एटीएम कार्ड, अंबिका यादव यांच्या गळ्यातील ३६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मणी मंगळसुत्र, कानातील फुले, अनुसया भोसले यांचे कानातील ८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे फुले, विमल घाटके यांचे गळ्यातील २० हजार रुपये किंमतीचे मणी मंगळसुत्र, शंकर भोसले यांचे पॉकीटातील नगदी १ हजार ३७० रुपये, क्रेडीट कार्ड, एटीएम, आधार कार्ड, पॅनकार्ड, लायसन्स असा एकुण ७२ हजार ३७० ऐवज काढून घेत कार परत वळवून अंबाजोगाई रस्त्याने निघून गेले.

धनाजी भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सहा दरोडेखोरां विरुद्ध केज पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!