वादळवार्ता वार्तांकन – केज
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळ णी समिती, बीड तर्फे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा दि.17.09.2022 ते दि.02.10.2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
त्यानिमित्त बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील महाविद्यालयातील प्राचार्य, समान संधी केंद्राचे प्रतिनिधी व लिपिक यांचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 27/09/2022 रोजी बाबूराव आडसकर महाविद्यालय केज” येथे केज तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे कर्मचारी यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली.
सदरील कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून श्रीमती एस आर मकरंद सदस्य तथा उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती बीड तर अध्यक्ष म्हणून श्री.व्ही.वाय चव्हाण प्राचार्य वसंत कनिष्ठ महाविद्यालय केज हे होते. कार्यक्रमाची प्रस्तावना पञावळे सर सूत्रसंचालन प्रा.समुद्रे सर व आभार प्रदर्शन बार्टी चे केज तालुक्याचे समतादूत श्री.नांदे आर ए यांनी केली. सेवा पंधरवाडा निमित्त 17 ते 30 सप्टेंबर पर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात 12 विज्ञान शाखेचे प्रस्ताव बीड कार्यालयात दाखल करावेत असे आवाहन श्रीमती एस आर मकरंद यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री. व्ही.आय चव्हाण सर यांनी जिल्हा जात पडतळणीसाठी महाविद्यालयातील युवकांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिविण्यासाठी योग्य ते सहकार्य केले पाहिजे असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.
जात वैधता प्रमाणपत्रसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे ,अर्ज ऑनलाईन करण्याची कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सदरील कार्यशाळेस केज तालुक्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, समान संधी केंद्राचे प्रतिनिधी व लिपिक उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!